सामाजिक माध्यमावर लाईक करण्याच्या बहाण्यातून ८ लाख रुपये उडाले
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका व्यक्तीला सामाजिक माध्यमावर लाईक करण्याच्या बहाण्यातून आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

छत्रपती संभाजीनगर: एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला सामाजिक माध्यमावर लाईक करून आणि कमेंट करण्याच्या बदल्यात १५० रुपये मिळतील, असे सांगून आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. तारिक अहमद सादीक अहमद (५२) यांना २१ फेब्रुवारीला एक मेसेज आला.
सामाजिक माध्यमावरील पोस्टला लाईक आणि कमेंट करून सहजपणे पैसे कमवता येतील, असे सांगून सायबर गुन्हेगारांनी त्याला फसवले. त्यासाठी अहमदला टेलीग्राम ग्रुपमध्ये जॉईन होण्यास सांगितले आणि १५ हजार रुपये देण्यास सांगितले. अहमदने पैसे दिले. त्यानंतर त्याच्या खात्यात २१ हजार रुपये जमा झाले. त्यामुळे अहमद फसवणुकीच्या जाळ्यात सापडला. त्याने थेट १.३८ लाख रुपये पाठवले. विविध बहाने करून गुन्हेगारांनी पैसे मागितले. अहमदला त्याच्या बँक खात्यात ११.१४ लाख रुपये जमा झाल्याचे खोटे मेसेज दाखवले. २१ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता अहमदने त्यांना संपर्क साधून पैसे खात्यात जमा न झाल्याचे सांगितले. त्यावर आरोपींनी तो पैसा मिळवून देण्यासाठी आणखी ६ लाख रुपये देण्यास सांगितले. आपल्याशी फसवणूक झाल्याचे समजताच अहमदने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. गुरुवारी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.